Mumbai Crime: बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने 42 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा

मुंबईत एका १६ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि ती गर्भवती राहल्याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Crime: मुंबईत एका 16 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि ती गर्भवती राहल्याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चौकशीतून असे समोर आले की, आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारीच राहायचा. मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होता. त्यानंतर डॉक्टरांनी  अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कांदीवली येथील चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवले. हेही वाचा- ‘सॉरी पप्पा, जेईई करू शकत नाही’; कोटा येथे तरुणाची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्याने आई आणि भावाने पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा काही तासांच उलगडा केला. मुलगी आपल्या आई, भाऊ आणि अंपग असलेल्या मावशी सोबत राहत होता. घर छोटं असल्यामुळे मावशी सोबत पीडित मुलगी दुसऱ्या खोलीत झोपायची. तेथे दुसऱ्या खोलीत शेजारचे काका आणि अपंगत्व असलेल्या मावशी आणि पीडित मुलगी झोपायची.

तेथे काकांनी वेळ प्रसंग साधून मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या चौकशीत असे समोर आले की, या सर्व गोष्टी सहमतीने झाल्या होत्या. कारण तीला ते आवडू लागले होते. अनेकदा घरच्या विरोधात देखील ती दुसऱ्या खोलीत झोपायला जायची. यावर मुंबई कोर्टाने निरिक्षणपणे निर्णय घेतला आहे की, पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तीची सहमती चालणार नाही. त्यामुळे आरोपीला दंड आणि शिक्षा द्यावीच लागणार आहे. पीडितेचे वय 18 पेक्षा खाली असल्यामुळे हे प्रकरण बलात्कारचे गार्ह्य धरले जाणार आहे. न्यायालयाने आरोपीला 10,000 रुपयांचा दंड ठोकवला आहे आणि दहा वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.