Human Trafficking And Prostitution Mumbai: मुंबई येथील वेश्याव्यवसाय दलालास मानवी तस्करी प्रकणात 10 वर्षांचा तुरुंगवास
हा व्यक्ती म्युझिक इंडस्ट्रीतील इनसाइडर म्हणून ओळखला जात असे.
मुंबईतील एका सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court ) सहावान अली उर्फ मन्नू कविराज या 45 वर्षीय व्यक्तीला मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात सहभाग असल्याबद्दल 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा व्यक्ती म्युझिक इंडस्ट्रीतील इनसाइडर म्हणून ओळखला जात असे. तो आपली मनोरंजन क्षेत्रात मोठी ओळख असल्याचे सांगत असे तसेच, विविध संगीतकार आणि निर्मात्यांसोबत भेट घडवून आणतो असे आश्वासन देऊन महिलांना जाळ्या ओढत असे. जाळ्यात अडकलेल्या महिलांना तो वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडत असे. अनेक महिलांना त्याने वेश्याव्यवसायात अडकवले, असल्याचे पुढे आले आहे.
मानवी तस्करीबद्दल चिंता
सहावान अली उर्फ मन्नू कविराज याचे कृत्याची सत्र न्यायालयाने गांभीर्याने दखळ घेतली. न्यायाधीश अश्विनी डी लोखंडे यांच्या खंडपीठापुढे हा खटला चालला. त्यांनी आपल्या निकालपत्रात जोर देत कोर्टाने म्हटले की, मानवी तस्करी ही जागतिक समस्या आहे. त्यासाठी संवेदनशील हाताळणी आवश्यक आहे. चित्रपट उद्योगात नोकरीच्या शोधात असलेल्या मुलींना फसवणे आणि त्यांना वेश्याव्यवसाय आणि तत्सम वाममार्गाला लावणे हे आरोपीचे कृत्य गंभीर आहे. (हेही वाचा, Prostitution Racket Busted in Chennai: चेन्नईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 14 वर्षांच्या बहिणीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपी बहिणीसह 5 जणांना अटक)
अटक आणि शिक्षा
सहावान अली उर्फ मन्नू कविराज यास 11 ऑक्टोबर 2019 रोजी आरे रोडवरील हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. तो आरे रोडवरील हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी खास सापळा रचला. त्यासाठी एक तोतया ग्राहक तयार केला. ज्याने अलीशी संपर्क साधला, तो पूरवत असलेल्या सेवांबद्दल चर्चा केली आणि त्याला UPI द्वारे 6,000 रुपये दिले. मिळालेली माहिती (टीप) खरी असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कारवाई केली. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. अलीला भारतीय दंड संहितेच्या कलम 370(3) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांनुसार दोषी ठरविण्यात आले, जे एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या तस्करीशी संबंधित आहे. (हेही वाचा, US Human Trafficking Case: अमेरिकेतील टेक्सासमध्ये मानवी तस्करीची घटना उघडकीस; 4 आरोपींमध्ये भारतीय जोडप्याचा समावेश)
न्यायाधीश लोखंडे यांनी टिपणी केली, “सुरुवातीलाच हे सिद्ध झाले आहे की, आरोपी चित्रपटसृष्टीतील व्यक्ती असल्याच्या बहाण्याने जाणूनबुजून अशा प्रकारच्या कमाईवर आपला उदरनिर्वाह चालवतो. त्याने अनेक महिला, मुलींना त्यांचे अल्बम निर्माते आणि संगितकारांना दाखविण्याचे आश्वासन देऊन त्याने जाळ्यात ओढले. तो त्यांना हॉटेलवर बोलवून त्यांच्याकडून गैरकृत्य करुन घेत असे.
साक्ष आणि पुरावा
सुटका करण्यात आलेल्या महिलेपैकी एका महिलेने महत्त्वपूर्ण पुरावे देत अलीविरुद्ध साक्ष दिली. अलीने 11 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारच्या वेळी तिचा अल्बम एका निर्मात्याला दाखवण्याच्या बहाण्याने तिला कसे बोलावले याचे तिने वर्णन केले. जेव्हा ती हॉटेलमध्ये आली तेव्हा तिला 420 क्रमांकाच्या खोलीत बेडवर एका पुरुषासोबत दुसरी मुलगी दिसली. अलीने तिला दुसऱ्या खोलीत राहण्यास सांगितले. उलटतपासणीदरम्यान बचाव पक्षाने तिच्या साक्षीला आव्हान दिले नाही.
विशेष सरकारी वकील गीता मालणकर यांनी अलीकडून केलेली फसवणूक आणि शोषणावर प्रकाश टाकत खटला सादर केला. न्यायालयाला अलीला दोषी ठरवण्यासाठी हा पुरावा पुरेसा वाटला आणि मानवी तस्करी ज्या गांभीर्याने त्याला पात्र आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज यावर जोर दिला.