Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई (Watch)
आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Couple Romance Viral Video) झाला आहे.
Couple's Bizarre Act On Two-Wheeler: सोशल मीडिया रिल्स बनविण्यासाठी तयार केले जाणारे व्हिडिओ आणि त्यासाठी निवडलेली ठिकाणे अनेकदा वादग्रस्त आणि तिचकीच चर्चेचा विषय ठरतात. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Couple Romance Viral Video) झाला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे आणि या व्हिडिओत (Mumbai Couple Romance Viral Video) दिसणाऱ्या जोडप्यावर पोलिसांनी म्हणे कारवाईसुद्धा केली आहे. सदर व्हिडिओ मुंबई येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, चालत्या दुचाकीवर एक जोडपे स्टंट करत आहे. दुचाकीवर पांघरुन घेऊन बसलेले हे जोडपे स्टंटच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि नियमबाह्य वर्तन करताना दिसत आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.
स्कूटरवर विचित्र पद्धतीने रोमान्स
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक जोडपे चालत्या बाईकवर बसले आहे. मात्र बाईक स्टंट करताना ते पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन (PDAs) मध्ये गुंतलेले आहे. दावा केला जात आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसणारे हे जोडपे मुंबईच्या वांद्रे रेक्लेमेशन परिसरात भटकते आहे. या जोडप्याला स्कूटरवर विचित्र पद्धतीने रोमँटिक कृत्य करताना पकडण्यात आले आहे. (हेही वाचा, Mumbai Bike Stunts Viedo: एक टाकीवर दुसरी पाठिवर; दोन महिलांसोबत तरुणाचा बाईक स्टंट; मुंबई पोलिसांकडून एकास अटक (पाहा व्हिडिओ))
पांगरुणाआडून चाळे
बांद्रा बझने X वर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक जोडपे हेल्मेट न घालता दुचाकीवर बसले आहे. जोडप्यापैकी तरुण दुचाकी चालवतो आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेली तरुणी त्याच्या पाठिमागे सीटवर बसण्याऐवजी ती चक्क त्याच्या दोन मांड्यांवर तोंड आणि पाय पाठीमागच्या दिशेला करुन बसली आहे. दोघांनीही पांघरुन घेतले आहे आणि त्या आडून चाळे सुरु आहेत. तरुणी तरुणाला भलतीच घट्ट बिलगली आहे. तरुणानेही तिला एका हाताने मिठी मारली असून दुसऱ्या हाताने दुचाकीचा हँडल पकडला आहे. दोघेही व्हिडिओ बनवत असून त्यांनी कॅमेऱ्याकडेही अनेक कटाक्ष टाकले आहेत आणि तरुणाने तरुणीचे हलकेसे चुंबन घेतल्याचेही पाहायला मिळते. जोडपे कॅमेऱ्याकडे पाहून हसते आहे आणि मग कॅमेरा बंद होतो. हा व्हिडिओ बांद्रा बझने मुंबई पोलिसांच्या @MumbaiPolice या एक्स हँडलला टॅग केला असून सदर जोडप्यावर कारवाईची मागणी केली आहे. रस्त्यावरील इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असे प्रकार टाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही या एक्स हँडलने म्हटले आहे. (Mumbai Bike Stunt: मुंबईतील युवकांचा दोन तरुणींसोबत बाईकवर स्टंट, पोलिसांत गुन्हा दाखल)
व्हिडिओ
व्हिडिओ पाहूून अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अनेकांन यावर जोरदार आणि तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. अशा लोकांमुळे रस्त्यावर अपघात होतात. अनेकांचे प्राण धोक्यात येतात. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. काहींनी मुंबई पोलिसांचे लक्ष या घटनेकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.