Mumbai Fire: मुंबईच्या यारी रोड येथे लागलेल्या आगीतून स्फोट; पाहा व्हिडिओ 

या आगीत संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली आहे.

Representational Image (Photo Credits: IANS|Representational Image)

मुंबईच्या (Mumbai) यारी रोडवर (Yari Road) मंगळवारी (9 फेब्रुवारी) भीषण आग लागली होती.  दरम्यान, आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, या आगीदरम्यान सतत स्फोट होत असल्याने यावर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अडथळा निर्माण होत आहे. महत्वाचे म्हणजे, ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अंधेरी लोखंडवाला ओशिवारा सिटीझन असोसिएशनने ट्वीटमध्ये माहिती दिली आहे की अंधेरी यारी रोड जवळील अराम नगरात काही प्रकारचे प्रेशर सिलिंडरचा स्फोट होत आहे. कृपया घरामध्येच रहा, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवा मार्गावर आहेत. हे देखील वाचा- Mulund Check Naka Fire: ठाणे येथील मॉडेल कॉलनीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ट्वीट- 

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सिलिंडरच्या होणाऱ्या स्फोटचा खूप मोठा आवाज ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिलिंडरच्या स्फोटात चार लोक जखमी झाले आहे. सर्व जखमींना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.