Mumbai: मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात
शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांच्या निष्क्रियतेमुळेत्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती.
मुंबईतील (Mumbai) वर्सोवा (Versova Police) पोलिसांनी काँग्रेसचे (Mumbai Congress) ज्येष्ठ नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना ताब्यात घेतले आहे. शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांच्या निष्क्रियतेमुळेत्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती. या मागणीसंदर्भात खासदार किर्तीकर यांच्यावर दबाव आणण्यासाठी निरुपम यांनी बाईक रॅली आयोजित केली होती. मात्र, पोलिसांनी तत्पूर्वच संजय निरुपम यांना ताब्यात घेतले. दरम्यान, कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले आहे.
संजय निरुपम यांनी इंग्रजी भाषेत केलेल्या ट्विटच्या मराठी भाषांतरानुसार त्यांनी म्हटले आहे की, ''आमचे स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. यासाठी दबाव आणण्यासाठी मी बाईक रॅली काढली होती. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे.'' (हेही वाचा, संजय निरुपम म्हणजे 'परप्रांतीय भटका कुत्रा' ; मनसेचा सोशल मीडियातून पलटवार)
गजान किर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या तिकीटावर निवडून आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यामुळे पक्षातच ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर संजय निरुपम हे किर्तीकर यांच्या निष्क्रियेविरोधात बाईक रॅली काढणार होते. पोलिसांनी तत्पूर्वीच संजय निरुपम यांना लोखंडवाला शास्त्रीनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.
ट्विट
गजानन किर्तीकर यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश म्हणजे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी निरुपम यांनी व्यक्त केली होती. ही मागणी लावून धरण्यासाठीच निरुपम यांनी आज दुपारी 2 च्या सुमारास बाइक रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांना ही रॅली काढता आली नाही.