'50 ग्रॅम पावडर प्रकरणात गोवून आयुष्यभर तुरुंगात टाकेन' मुंबई पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा Mumbai Congress चा आरोप; व्हिडिओ वायरल

मुंबई काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आरोप केला आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनासाठी परतल्यास खोट्या अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आहे.

Mumbai Congress Accuses Policeman of Threatening Student Protesters

मुंबई काँग्रेसने (Mumbai Congress) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनासाठी न येण्याची धमकी दिली आहे. सोबतच त्यांना खोट्या अमली पदार्थ प्रकरणात  (False Drugs Cases) अडकवण्याचा इशारा दिला आहे. कॉंग्रेसच्या दाव्यानुसार, संबंधित अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना "50 ग्रॅम पावडर" प्रकरणात गोवून आयुष्यभर तुरुंगात राहावे लागेल, असे सांगितले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या व्हिडिओची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी त्याच्या सत्यतेबाबत आणि घटनेच्या परिस्थितीबाबत चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा निकाल येईपर्यंत, व्हिडिओमध्ये वाहनचालक म्हणून दिसणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला सध्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी पुढील कारवाई चौकशीत समोर येणाऱ्या निष्कर्षांवर अवलंबून असेल.

मुंबई काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर, आरोपांची मालिका

मुंबई काँग्रेसने एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आरोप केला की, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने धमकावले आणि भविष्यात आंदोलनासाठी न येण्याचा इशारा दिला.

मुंबई काँग्रेसच्या पोस्टनुसार, संबंधित अधिकाऱ्याने कथितरित्या विद्यार्थ्यांना सांगितले की, ते पुन्हा आंदोलनासाठी परतल्यास त्यांना खोट्या अमली पदार्थ प्रकरणात अडकवले जाईल आणि यामुळे त्यांना आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावे लागेल.

काँग्रेसने या कथित वक्तव्याचे वर्णन विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न असे केले असून, लोकशाही अधिकारांचे संरक्षण व्हायला हवे, असे म्हटले आहे. नक्की वाचा: दादरमधील आंदोलनात पोलिसांवर संतापलेल्या महिलेचे संजय राऊतांकडून कौतुक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.

काँग्रेसकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

मुंबई काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे आरोप खरे असल्यास, अशा प्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांच्या आंदोलन करण्याच्या लोकशाही हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न ठरेल. पक्षाने पुढे असेही नमूद केले की, प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या देण्याऐवजी उत्तरदायित्व दाखवले जावे.

(व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यासंबंधी करण्यात आलेल्या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement