Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोड लवकरच सी लिंकशी जोडला जाणार; जूनपर्यंत सुरु होणार पूर्ण मार्ग

या मार्गावर बऱ्याच दिवसांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत रहदारी असते.

Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

Mumbai Coastal Road To Be Connected With Sea Link: मुंबईमध्ये 12 मार्च रोजी कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) अंशतः खुला करण्यात आला. यामुळे मुंबईमधील प्रवास नक्कीच वेगवान झाला आहे. आता कोस्टल रोड हा वांद्रे-वरळी सी लिंकला (Sea Link) जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास सोपा आणि आणखी जलद होणार आहे. मुंबई महानगरपालिका कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकसह जोडण्याचे काम 16 एप्रिल किंवा 17 एप्रिल रोजी सुरू करण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत हा रस्ता पूर्णपणे खुला केला जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे.

सी-लिंकमुळे वरळीतील कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रेहून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना सध्याचा सी लिंक वरळी जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. ही वाहने सी-लिंकद्वारे कोस्टल रोड कनेक्टिव्हिटीद्वारे थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतात.

कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एमएम स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामासाठी 46 मीटर, 44 मीटर आणि 60 मीटरचे तीन गर्डर आधीच सुरू करण्यात आले आहेत. हवामानाच्या परिस्थितीनुसार, 16 किंवा 17 एप्रिल रोजी गर्डरचे लोकार्पण केले जाईल. कोस्टल रोड आणि सी लिंक दरम्यानचा स्पॅन 850 मीटर रुंद आणि 270 मीटर रुंद असून पुलासाठी वापरण्यात येणारी धातू स्टीलची असेल. कोसात्लरोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वात मोठा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे हे 120 मीटरचे अंतर जोडले जाणार आहे. (हेही वाचा: Mumbai Accident: बोरिवलीत रस्ता ओलांडताना वेगवान कारच्या धडकेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालकाला अटक)

दरम्यान, कोस्टल रोड अंशत: उघडण्यात आल्यापासून, वरळी ते मरीन ड्राइव्ह या नऊ मिनिटांच्या सिग्नल-फ्री ड्राइव्हवर जवळपास 4.5 लाख वाहनांनी प्रवास केला आहे, ज्यात दररोज सरासरी प्रमाण 19,500 वाहने आहेत. या मार्गावर बऱ्याच दिवसांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत रहदारी असते, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौकापासून मरीन ड्राइव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरच्या पुढे दक्षिणेकडील बोगद्याच्या बाहेर जाण्यासाठी एका दिशेने खुला असलेला हा रस्ता, सोमवार-शुक्रवार, सकाळी 8 ते 8 वाजेपर्यंत खुला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif