Mumbai: शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी CM Eknath Shinde यांची विविध वसाहतींना भेट; सफाई कामगारांसाठी घेतला मोठा निर्णय

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.

CM Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली. (हेही वाचा: State Ministers Foreign Tours: राज्यातील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर Aaditya Thackeray यांचा निशाणा; मंत्री Uday Samant यांच्या लंडन-म्युनिक-दावोस भेटीबाबत उपस्थित केले 'हे' प्रश्न)

त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पूर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयांमध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी, अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement