मुंबईकरांकडून कोस्टल रोड प्रकल्पाविरोधात मोर्चा
मुंबईकरांकडून आज रविवारी (10 मार्च) सकाळी कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पासाठी विरोध करण्यात आला.
Mumbai: मुंबईकरांकडून आज रविवारी (10 मार्च) सकाळी कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पासाठी विरोध करण्यात आला. त्यावेळी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन रॅलीच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. तर 22.9 किमी कोस्टल रोड प्रकल्प हा कांदिवली ते मरिन लाईन्स पर्यंत उभारण्यात येणार आहे. ब्रीज कँन्डी येथील टाटा गार्डन येथे काही कार्यकर्त्यांनी शांतपणे मोर्चा काढला होता.
तर पोलिस या कार्यकर्त्यांविरुद्ध लवकरच कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच रस्त्यावर उभे राहून मोर्चा पाहणाऱ्यांना पोलिसांनी थांबण्यास मनाई केली. पोलिसांच्या परवानगी शिवाय हा मोर्चा पुढे जाण्यासाठी बंदी घातली गेली.
तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोड प्रकल्पाबद्दल कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला होता. तर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि एनएम जामदार यांच्या खंडपीठाने याबाबत तोंडी निर्णय दिला होता.