मुंबई : बाल कलाकार ठरली एकतर्फी प्रेमाची शिकार, हिरानंदानी रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास, (वाचा सविस्तर)

मुंबईच्या टीव्ही इंडस्ट्री मधील एका १५ वर्षीय बालकलाकार मुलीची एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे समजत आहे, एका अल्पवयीन माथेफिरू मुलाने तिला इमारतीच्या आठव्या मजल्यावरून ढकलून दिल्याने तिच्या मेंदूला जबर मार लागला होता, त्यानंतर शुक्रवारी तिने हिरानंदानी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

Representational Image | (Photo Credits: ANI)

टीव्ही सिरिअल्स  मध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पवई (Powai) च्या हिरानंदानी रुग्णालयात (Hiranandani Hospital)   मृत्यू झाल्याचे समजत आहे, या मुलीचे नरमा (Narma) असून मागील सात दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते, प्राप्त माहितीनुसार या मुलीला तिच्या कथित प्रियकराने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून ढकलल्याने तिच्या मेंदूला जबर मार लागला होता, ज्यांनंतर शुक्रवारी दुपारी तिने अखेरचा श्वास घेतला.

नेमकं घडलं काय?

मटाच्या वृत्तानुसार, आरे कॉलनीमध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षांच्या नरमा वर एका अल्पवयीन मुलाचे प्रेम होते. मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. तरीही या मुलाने तिचा पाठलाग सोडला नाही. ती कधीही घराबाहेर एकटी दिसली की तो कारण काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. 29 जून रोजी या मुलाने तिला भेटण्यासाठी बोलाविले. त्यामुळे ती पाणीपुरी खायला जाते, असे कारण सांगून ती बाहेर पडली आणि या मुलाला भेटायला गेली. काही वेळाने मुलगी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून जखमी झाल्याचे तिच्या पालकांना समजले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मुलीला उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले गेले.

सुरवातीला तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र तपासामध्ये या मुलानेच तिला ढकलल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर आरे पोलिसांनी त्या मुलाला व त्याच्या आई-वडिलांना अटक केली. लग्नाला नकार दिल्याने प्रेयसी भडकली चालत्या बाईकवर मागे बसून केला प्रियकरावर ऍसिड हल्ला

दरम्यान या मुलीवर हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये उपचार सुरु होते, मेंदूला मार लागल्याने तिच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. या उपचाराचा खर्च तब्बल 8 लाखांवर गेला होता, त्यामुळे अभिनेत्री सनी लिओनी हिने सुद्धा नरमाच्या उपचारासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते, बुधवार पासून नरमाच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती, पण अखेरीस शुक्रवारी तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तूर्तास तिचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवला असून यानंतर पुढील तपास केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement