Mumbai News: चेंबूरमध्ये भरधाव कारने स्कूटरवर असलेल्या तिघांना उडवले, महिला चालक मद्यधुंद असल्याची माहिती

मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ मध्यरात्री एका मद्यधुंंद महिला कारचालकाने तिघांना उडवले आहे.

Chembur Accident

Mumbai News:  मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ मध्यरात्री एका मद्यधुंंद महिला कारचालकाने तिघांना उडवले आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत चेंबूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. या घटनेअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ही कुर्ल्याची रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ती व्यवसायाने आर्किटेक आहे. महिला बेंधुद होऊन गाडी चालवत होती. पोलिसांनी या महिलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला मद्यधुंद अवस्थेत चेंबूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती. महिलेचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकीवरून समोरून स्कूटीवरून असलेल्या जैस्वल कुटुंबाल धडक दिली. या जोरदाक धडकेत तिघं ही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. चेंबुर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद असलेल्या त्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेवर मद्यधुंद अवस्थेत कार चालवण्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी कुर्ला येथील रहिवासी आहे. या अपघातात हर्ष जैस्वाल, समृध्दी जैस्वाल, दिप जैस्वाल हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. रस्त्यावर अपघातानंतर स्थानिकांनी गर्गी केली.