मुंबई: मध्य रेल्वे सेवा पूर्ववत; सायन-माटुंगा दरम्यान झाडाला आग लागल्याने वाहतूक झाली होती विस्कळीत
कालसुद्धा (सोमवार, 4 जुलै 2019) मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विस्कळीत झालेली मुंबई मध्य रेल्वे (Central Railway Mumbai) सेवा अखेर पुर्ववत झाली आहे. सायन-माटूंगा रेल्वे (Sion-Matunga Railway Station) स्थानकादरम्यान झाडाला आग लागल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनज (CSMT) येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या एकापाठोपाठ थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा हा दुसरा दिवस होता. कालसुद्धा (सोमवार, 4 जुलै 2019) मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा महत्त्वाच्या सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत होता. (संदर्भासाठी हे पाहा, मुंबई: सायन-माटुंगा दरम्यान झाडाला आग लागल्याने मध्य रेल्वे वाहतू सेवा विस्कळीत)
संध्याकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.