कोपर- दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
त्यातच मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या लोकल वेळेवर न आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो.
मध्य रेल्वे (Central Railway) स्थानकांवर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते. त्यातच मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या लोकल वेळेवर न आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो. परिणामी लोकलमध्ये गर्दी दिसून येते. तर आज (22 जुलै) कोपर-दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सीएसएमटीसाठी डोंबिवली येथून निघालेल्या फास्ट लोकलमधून पडून सविता नाईक या तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. तर कोपर-दिवा स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत पावलेल्या तरुणीला डोंबिवली येथे आणण्यात येणार आहे.(लग्नपत्रीका वाटण्यासाठी पुणे येथून मुंबई शहरात आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू)
यापूर्वीसुद्धा लोकलमधून पडून अपघात झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर गेल्याच महिन्यात पुणे येथून मुलाच्या विवाहाच्या पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.