Mumbai Central Railway AC Local: मुंबई मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावर 10 एसी लोकल धावणार

त्यावेळी प्रवाशांनी याला विरोध केला होता. कळवा स्थानकात प्रवाशांनी आंदोलन छेडले होते.

AC local trains (Photo Credit: PTI)

मुंबईत मध्य रेल्वेवरचा (Central Railway Main Line) प्रवास हा आणखी गारेगार हा होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आता आणखी 10 एसी लोकल धावणार आहेत. या एसी लोकल (AC Local) नॉन एसी लोकलची (Non AC Local) जागा घेणार आहेत. त्यामुळे नॉन एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे. तसेच एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai Local: डहाणूजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळित)

मध्य रेल्वे 6 नोव्हेंबर 2023 पासून सामान्य (Non-AC) सेवा बदलून आणखी 10 वातानुकूलित लोकल सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकल सेवेची एकूण संख्या दररोज 66 इतकी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी सेवांची संख्या 1810 राहणार आहे. या 10 सेवांपैकी एक एसी लोकलही सकाळी आणि एक संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. या वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावणार आहे.

नविन वातानुकूलित गाडया

काही दिवसांपुर्वी बदलापूर, कळवा येथून मध्य रेल्वेने साध्या लोकलच्या ऐवजी पुन्हा एसी लोकल सुरू केली होती. त्यावेळी प्रवाशांनी याला विरोध केला होता. कळवा स्थानकात प्रवाशांनी आंदोलन छेडले होते.