मध्य रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटे उशिरा,प्रवाशांची स्थानकावर गर्दी
त्यामुळे लोकल 10-15 मिनिटे उशीराने धावत आहे.
ऐन कामाला जायच्या वेळेस आजसुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल 10-15 मिनिटे उशीराने धावत आहे. यामुळे जलद मार्गावरील वाहुकीवर परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. तसेच लोकल उशिराने धावण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तर कालच दिवा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला होता.
तर आज सलग दुसऱ्या दिवशीसुद्ध लोकल उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.