Biker Threatens Bandra Woman: व्यावसायिक महिलेचा दुचाकीस्वाराकडून पाटलाग, बलात्काराची धमकी; FIR दाखल, मुंबई येथील वांद्रे परिसरातील घटना

मुंबई येथील एका 49 वर्षीय व्यावसायिक महिलेस भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. एका दुचाकीस्वार व्यक्तीने या महिलेच्या एसयूव्हीचा पाटलाग केला. तसेच, तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याची धमकी (Biker Threatens Woman) दिली. ही घटना वांद्रे पश्चिम परिसरात गुरुवारी (22 ऑगस्ट) रोजी घडली.

Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Traffic Rules Violation Mumbai: मुंबई येथील एका 49 वर्षीय व्यावसायिक महिलेस भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. एका दुचाकीस्वार व्यक्तीने या महिलेच्या एसयूव्हीचा पाटलाग केला. तसेच, तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याची धमकी (Biker Threatens Woman) दिली. ही घटना वांद्रे पश्चिम परिसरात गुरुवारी (22 ऑगस्ट) रोजी घडली. संशयीत आरोपीने महिलेचा कथीतपणे 10 मीनिटे पाटलाग केला. प्राप्त माहितीनुसार, पाली नाक्याजवळ (Pali Naka Incident) दुपारी 12:50 च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारकरदार महिला कामावर निघाली होती. दरम्यान, एक दुचाकीस्वार तो नो-एंट्री लेनमध्ये आला. या दुचाकीस्वारास महिलेने तो प्रवेश निशिद्ध असलेल्या मार्गावर असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने महिलेचा पाटलाग केला आणि तिला धमकी दिली.

सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन सुरु

वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  मुंबई पोलीस (Mumbai Police) सदर घटनेबाबत बोलताना म्हणाले की, आमचे पथक आरोपींचा शोध सक्रियपणे घेत आहे. संशयिताची ओळख पटवण्यासाठी आणि मोटरसायकलचा नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी आम्ही वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन करत आहोत. महिलेने पोलिसांशी संपर्क साधल्याचे लक्षात येताच तो माणूस पळून गेला,” अशी आमची स्थानिक माहिती आहे. (हेही वाचा, Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी)

पाली नाका येथील घटना

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही घटना दुपारी 12:55 ते 1:05 च्या दरम्यान घडली. जेव्हा महिला पाली नाका येथील तिच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात होती. तिच्या तक्रारीत, तिने सांगितले की, “नो-एंट्री लेनमध्ये दुचाकीस्वार चालताना माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्यास त्याने वाहतुकीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर तो संतापला आणि त्याने जवळच्या इमारतीकडे जात असल्याचा दावा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Tinder डेटींग ॲपवर मुंबईतील तरुणाची फसवणूक; दोन तासाच्या डेटसाठी भरले चक्क 60 हजारांचे बील)

महिलेने तिच्या निवेदनात आरोप केला आहे की, महिलेने दुचाकीस्वाराच्या अपमानास्पद वागणुकीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करूनही तो तिचा पाठलाग करत राहिला. "10 मिनिटांच्या पाठलागानंतर, त्याने माझे वाहन अडवले. मला धमकावले आणि तो माझ्यावर बलात्कार करेल अशी त्याने मला ओरडून धमकी दिली," दरम्यान, पीडित ती महिला तिच्या एसयूव्हीमध्येच राहिली आणि पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी लगेच 100 नंबर डायल केला. अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. "आम्ही सध्या आरोपीला ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन करत आहोत आणि मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक शोधत आहोत. एका महिलेने पोलिसांना फोन केल्याचे पाहून संशयित पळून गेला," असे वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement