Mumbai News: अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरच्या‌ मुलाचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, अंधेरीतील घटना

कृष्णाचे वडील अनुपम अग्रवाल हे अमेरिकेत वास्तव्याला असून तिथले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत डॉक्टर अग्रवाल पत्नी आणि मुलगा, मुलीला मुंबईला फिरायला घेऊन येतात.

Mumbai News: अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरच्या‌ मुलाचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, अंधेरीतील घटना
Dead-pixabay

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील (Andheri) मरोळ परिसरातील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वसंत ओएसिस या इमारतीमधून पडून त्याचा मृत्यू झाला. कृष्णा अग्रवाल असं मृत मुलाचं नाव आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अगरवाल यांचा हा मुलगा आहे. तो नुकताच आपल्या आईसोबत मुंबईत सुट्टीसाठी आला होता. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महापालिकेच्या विलेपार्ले इथल्या कूपर रुग्णालयात पाठवला.

मुलाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावून एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याचं समजलं. त्यातच मोबाईल फोनवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला असावा असं कळतं. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

[Poll ID="null" title="undefined"] यंदाही ते सुट्टीसाठी मुंबईत आले होते. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरातील वसंत ओएसिस या इमारतीत ते राहत होते. 30 जून रोजी संध्याकाळी इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांनी मुलाचा मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला आहे. या मुलाकडे आयफोन होता. या मोबाईल फोनमध्ये भरपूर गेम असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हा मुलगा गेम खेळत असताना टास्क पूर्ण करण्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला असावा आणि त्यातच इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).