मुंबई: वरळी येथे समुद्रात बोट बुडाली, 6 जण सुरक्षीत एक बेपत्ता

तटरक्षक दलाचे जवान आणि २ जहाजे आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने बोट दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या व्यक्तिचा शोध घेत आहेत.

Boat drowning in Worli Sea | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) शहरातील वरळी (Worli) येथे एक बोट (Boat) समुद्रात बुडाल्याचे वृत्त आहे. बोटीत असलेल्या एकूण 7 लोकांपैकी 6 जण सुरक्षित तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही बोट नेमकी कोणाच्या मालकीची आहे. तिला अपघात झाला की, काही त्रांत्रिक कारणामुळे ती बुडाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीवरील बहुतांश लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले. बोटीवरील खलाशी आणि इतर सर्व लोक सुरक्षीत आहेत. सर्वांना योग्य तो प्राथमिक उपचार देण्यात आला आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, बोटीवर असलेला एक जण मात्र अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे. तटरक्षक दलाचे जवान आणि २ जहाजे आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने बोट दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या व्यक्तिचा शोध घेत आहेत.