BMC Withdraws Water Cut: मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट पूर्ण टळलं; तलावांमध्ये 95% च्या पार पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं 95% पेक्षा अधिक भरल्याने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
महिन्याभरापूर्वी अवघा 34% पाणी साठा असल्याने मुंबईकरांवर (Mumbai) यंदा पाणी कपातीचं संकट (Water Supply Cut) घोंघावत होते. मात्र आता ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस धरण क्षेत्र आणि तलावांमध्ये झाल्याने आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी कपातीमधून मुक्त केले आहे. 5ऑगस्ट पासून असणारी 20% पाणी कपात 21 ऑगस्टला कमी करून 10% करण्यात आली होती. आता ही 10% पाणी कपात देखील 29 ऑगस्ट पासून पूर्ण रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी झुंजणार्या मुंबईकरांवरून पाणी कपातीचं संकट दूर झालं आहे. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं 95% पेक्षा अधिक भरल्याने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. Modak Sagar: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला, वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले.
मुंबईला तानसा, भातसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि अप्पर वैतरणा या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान यापैकी तुळशी, विहार, मोडक आणि तानसा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. तर उर्वरित तलावं देखील पूर्ण भरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदा पाणी पुरवठा नियामित सुरू राहणार आहे. ही आनंदाची बाब आहे. मुंबईला सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तलावांमध्ये14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाण्याचा साठा आवश्यक आहे. Maharashtra Monsoon Updates: विदर्भ, मराठवाडा आणि नॉर्थ कोकणात पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढणार-IMD.
ANI Tweet
मुंबईमध्ये मागील 5-6 दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा परतला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रात यंदा ऑगस्ट महिन्यात 50% अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.