मुंबई: New Year च्या पार्टीवर BMC ठेवणार करडी नजर, जरा सावधच रहा!

New Year's Party (Photo credits: Needpix)

मुंबईत जर तुम्ही नव्या वर्षाच्या आगमानसाठी जोरदार पार्टीचा प्लॅन करत असाल तर जरा जपूनच. कारण नव्या वर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांसह आता महापालिकेची सुद्धा करडी नजर असणार आहे. त्यामुळे असे काही करु नका जेणेकरुन तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. याच पार्श्वभुमीवर कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना वेळोवेळी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मास्क शिवाय पार्टी करताना दिसून आल्यास तुमच्या विरोधात महापालिकेकडून कारवाई केली जाऊ शकते. यासाठी मुंबईतील 24 वॉर्डात विविध टीम तयार करण्यात आल्या असून त्या कोरोनाच्या काळात ही धूमधाम पद्धतीने पार्टी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे.

प्रत्येक असिस्टंट आयुक्तांना ही कठोर सुचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या वॉर्डाअंतर्गत येणाऱ्या नाइट क्लबवर ही छापेमारी करण्यासाठी टीम तयार केली आहे. या प्रत्येक टीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि क्लिन अप मार्शल यांचा समावेश असणार आहे. तर नव्या वर्षाची पार्टी फक्त नाइट क्लबच नव्हे तर घरातील पार्ट्यांवर ही नजर ठेवली जाणार आहे.(यावर्षी Christmas आणि New Year साजरा करता येणार नाही? लवकरच मुंबई महापालिका जाहीर करणार नवी नियमावली)

खरंतर नव्या वर्षासाठी करण्यात येणाऱ्या पार्ट्यांसाठीच महापालिकेने हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. तर महापालिकेने नुकत्याच नाइट क्लबमध्ये रेड टाकली असता कमी जागेतच नागरिकांकडून मास्क न घालता पार्टी करत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर लोअर परेल ते मलाड पर्यंत नाइट क्लबवर छापेमारी करत महापालिकेने लाखो रुपयांचा दंड ही वसूल केला. तसेच या क्लबच्या विरोधात एफआयआर ही दाखल केला आहे.(BMC: विना मास्क नाईट क्लबमध्ये करत होते हुल्लडबाजी; मुंबई महानगरपालिकेने ठोठावला 30 हजारांचा दंड)

महापालिका आयुक्तांनी असे ही स्पष्ट केले आहे की, जर लोकांमध्ये सुधारणा झाली नाही तर नव्या वर्षाच्या दरम्यान मुंबईत रात्री संचारबंदी सारखा निर्णय घेतला जाईल. तर कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुंबईत आता सुद्धा कलम 144 लागू आहे. त्याअंतर्गत रेस्टॉरंट, बार, पब फक्त 11.30 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत. मात्र कोरोनाची परिस्थिती विसरुन काही ठिकाणी पार्ट्यांचे रात्री उशिरा पर्यंत आयोजन केले जात आहे.