मुंबई: BMC च्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने 300 पेक्षा अधिक नर्सिंग होमला पालिकेकडून टाळंं
त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मात्र या काळात कोरोनाबाधितांवर दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मात्र या काळात कोरोनाबाधितांवर दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत. परंतु नॉन-कोविड रुग्णांसाठी दवाखाने, नर्सिंग होम सुरु करा अशी वारंवार सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ते सुरु न करण्यात आल्याने नॉन-कोविड रुग्णांची गैरसोय होत आहे. याच कारणास्तव महापालिकेने खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम यांना ते सुरु करण्यास सांगितले होते. परंतु वारंवार सुचना देऊन सुद्धा ते चालू न केल्याने आता महापालिकेने (BMC) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबईतील 300 पेक्षा अधिक नर्सिंग होमला टाळ लावण्यात आले आहे.
चाळीतील किंवा सोसायटी परिसरातील नागरिकांनी दवाखाने सुरु करण्यास विरोध केल्यास त्यांच्या विरोधात साथरोग कायदा 1897 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे संकेत सुद्धा महापालिकेने दिले आहेत. महापालिकेच्या सर्व विभागातील वैद्यकिय अधिकारी प्रत्येक वॉर्डातील दवाखाने किंवा नर्सिंग होमचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यानुसार जे दवाखाने किंवा नर्सिंग होम बंद दिसून येतील त्यांच्या विरोधात कारवाई करत परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्याचसोबत खासगी दवाखान्यांसाठी सुद्धा हा नियम लागू असणार आहे. तर दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान स्पर्श न करता तपासावे असे सांगण्यात आले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला महापालिकेच्या क्वारंटाइन केंद्रावर पाठवावे. खासगी दवाखांन्यामध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरु ठेवण्यात यावेत असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी किंवा वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तपासताना कोरोनाच्या संबंधित सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.(कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांसाठी दवाखाने, नर्सिंग होम वारंवार सुचना देऊन बंद ठेवणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे माहापालिका आयुक्तांचे आदेश)
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे असे वांरवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडत लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
मजूरांना घरी पोहचवण्याची व्यवस्था करू- उद्धव ठाकरे; ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा : Watch Video
या कारणामुळे पोलिसांकडून आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनच्या आदेशासंदर्भात निर्णय जाहीर केला जाणार आहे.