IPL Auction 2025 Live

मुंबईकरांनो कचरा केल्यास अतिरिक्त कर भरावा लागेल, महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत

तसेच स्वच्छता मोहिम राबवूनसुद्धा यावर तोडगा निघाला नाही आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) सध्या बहुतांश ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. तसेच स्वच्छता मोहिम राबवूनसुद्धा यावर तोडगा निघाला नाही आहे. तर काही नागरिक कचरा डब्यात टाकण्याऐवजी खालीच टाकून निघून जातात. त्यामुळे कचऱ्याचा ढिग साचलेला पाहायला मिळतो. मात्र आता लवकरच मुंबई महापालिका कचरा केल्यास त्यावर अतिरक्त कराची वसूली करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कचरा कोठेही टाकत असाल तर काळजी घ्या.

सध्या महापालिकेकडून कचऱ्यावर कोणताही कर आकारला जात नाही. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महापालिकेचे मानांकन घसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हे मानांकन टिकवून ठेवण्यासाठी आता महापालिका कचरा केल्यास त्यावर अतिरक्त कर लावणार असल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप काही गोष्टींबाबत विचार केला जात असून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

(मुंबई: HIV ग्रस्त विधवांना मुंबई महानगर पालिका देणार दरमहा पेन्शन)

तर मुंबईत महापालिकेने रस्त्याच्या कडेलगत किंवा उघड्या ठिकाणांसह सर्वत्र ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. परंतु नागरिक ओला-सुका कचरा एकाच ठिकाणी टाकत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे आता जे मुंबईकर ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करणार असल्यास त्यांना मालमत्ता करावर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे.