Vaccination for Children: लहान मुलांसाठी COVID19 लसीकरणासाठी महापालिका सज्ज- महापौर किशोरी पेडणेकर
त्यासाठी केंद्र सरकारने गाइडलाइन्स जाहीर केल्यानंतर त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम सुरु होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Vaccination for Children: महापालिकेकडून लहान मुलांचे लसीकरण हे 2-17 वयोगटात पार पाडले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने गाइडलाइन्स जाहीर केल्यानंतर त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम सुरु होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबईत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने किशोरी पेडणेकर यांना नागरिकांनी पुढे येऊन लस घेण्याची विनंती केली आहे. त्याचसोबत महापालिकेकडून चालते फिरते लसीकरण बेस्ट बसच्या माध्यमातून सुरु केले आहे.
आता आयसीएमआर कडून गाइडलाइन्स जाहीर झाल्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहेत. तर 2-17 वयोगटातील एकूण 33 लाख मुले असल्याचे सांगण्यात आले आहे. आमची लसीकरण केंद्रे सर्वांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत जागेवरच असलेल्या नागरिकांना सुद्धा घरी जाऊन लस दिली जात असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.(Mumbai Local: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान)
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 12-17 वयोगटातील 10 लाख मुलांना लसीचे डोस दिले जाणार आहेत. या संदर्भातील चाचणी सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. तर 18 वर्षावरील 55 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्याचसोबत 97 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार येत्या 22 ऑक्टोंबर पासून थिएटर्स, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने, हॉटेल्स सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. कोरोना व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्यांच्या उपचारांकडे ही पुरेसे लक्ष द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.