मध्य, पश्चिम रेल्वे डिफॉल्टर यादीत, महापालिकेचे 233 कोटी पाणी बिल थकीत
रेल्वे प्रशासनाने मुंबई (Mumbai) महानगरपालिकेचे (BMC) 233 कोटी रुपये थकवल्याची बाब समोर आली आहे.
रेल्वे प्रशासनाने मुंबई (Mumbai) महानगरपालिकेचे (BMC) 233 कोटी रुपये थकवल्याची बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेने मध्य आणि पश्चिम रेल्वेला डिफॉल्टर यादीमध्ये टाकले आहे. याबद्दल आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी थकबाकीची माहिती मागवली होती त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने 233 कोटी पाण्याचे बिल थकवले आहे. त्याचसोबत दोन्ही मार्गावरील 122 जल जोडण्यांना डिफॉल्टर यादीमध्ये टाकले आहे. त्यात मध्य रेल्वेच्या 67 जल जोडण्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या 55 जलजोडण्यांचा समावेश आहे.
(मुंबई मरिन ड्राइव्ह येथे दोनजण बुडाल्याने खळबळ; पोलिसां सह नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल)
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी होती. पालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला डिफॉल्टर यादीतदेखील टाकले होते.