मुंबईत बेकायदेशीर गाडी पार्किंगच्या नियमानुसार एका आठवड्यात 26 लाखांची दंडवसूली
मुंबईत बेकायदेशीर गाडी पार्किंगच्या नियमानुसार एका आठवड्यात 26 लाखांची दंडवसूली
मुंबईत (MUmbai) 7 जुलै पासून बेकायदेशीर गाडी पार्किंग संबंधित महापालिकेकडून (BMC) नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार 15 हजार रुपयांपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तर गेल्या आठवड्यात बेकायदेशीर पद्धतीने गाडी पार्किंगसंबंधित जवळजवळ 26 लाख रुपयांची दंड वसूली करण्यात आली आहे. या दंडवसूलीत 505 वाहनचालकांना दणका देण्यात आला आहे.
सध्या महापालिकेची गाडी पार्किंगसाठी जागा अपूरी पडत आहे. त्यामुळे गाडी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहनचालक कोठेही गाडी पार्किंग करताना दिसून येतात. याचा परिणाम तेथील परिसराती नागरिक किंवा वाहतूक कोंडीवर होते. त्यामुळेच बेकायदेशीर पार्किंगसाठी दंडाची वसूली करण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला. तर 500 मीटर अंतराच्या आतमध्ये पार्किंग केल्यास कारवाई होणार आहे. यानुसार आतापर्यंत 26 लाख रुपयांची दंड वसूली करण्यात आली आहे.(मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी चक्क नो पार्किंग क्षेत्रात उभी, तरीही कारवाई किंवा दंडवसूली नाही?)
तर गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सुद्धा गाडी नो पार्किंग क्षेत्रात उभी असल्याचे दिसून आले होते. तर महाडेश्वर यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आले असून त्यांना ई-चलन पाठवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.