मुंबई: भाजप नेते तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल

चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. लखाडच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण भारत पेटून उठला आहे.

बीजेपी (Photo Credits: IANS)

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. लखाडच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण भारत पेटून उठला आहे. यातच भाजप युवा मोर्चा मुंबई युनिटचे प्रमुख तेजिंदरसिंग तिवाना (Tejinder Singh Tiwana) यांनी मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) परिसरात चीनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन केली आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे बांगूर नगर पोलिसांनी त्यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू आदिंना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला सर्मथन करावे, असे आवाहन कॉन्फेड्रेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स या व्यापारी व्यवसायिकांच्या देशव्यापी संघटनेने केले होते. तर भाजपच्या मुंबई शाखेच्या सनदशीर मार्गाने चिनी मालाचा नाश करण्याचे आंदोलन सुरू केले आहे. यातच तेजविंदरसिंग तिवाना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मालाडमधील एव्हरशाईन नगर परिसरात चीनी उत्पदनाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर आंदोलन सुरू केली. या वस्तूची विक्री करू नये त्यांनी आंदोलन केली. इतक्या वर न थांबता त्यांनी थेट दुकानांमधील काही चीनी वस्तूदेखील बाहेर फेकल्या आहेत. हे देखील वाचा- Mumbai Police: Coronavirus लढ्यात मृत्यू झालेल्या पोलिसांना 'शहीद' म्हणून संबोधले जावे- मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची मागणी

तेजिंदरसिंग यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कलम 188 आणि कलम 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यापैकी कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशीही माहिती बांगूर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.