बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परंतु 'या' कारणामुळे 9 दिवसांचा पगार कापला
परंतु कर्मचाऱ्यांना वेतनवाढीत फक्त तीन ते चार हजार रुपयांचीच वाढ केली आहे.
बेस्ट कर्माचाऱ्यांना दिल्या गेलेल्या आश्वासानानुसार जानेवारी महिन्यापासून वेतनवाढ करण्यात आले आहे. परंतु कर्मचाऱ्यांना वेतनवाढीत फक्त तीन ते चार हजार रुपयांचीच वाढ केली आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांनी वेतनवाढ होणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुन्हा हे आश्वासन फोल ठरले आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्यात पुकारलेल्या 9 दिवसाच्या संपाच्या हाकेचा परिणाम त्यांच्या पगारावर झाला असून चक्क 9 दिवसांचे पैसे कापले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगीचा सुरु दिसून येत आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात सॅलरी स्लिप दिली गेली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना पगार वाढणार असल्यामुळे आनंद झाला. मात्र जेव्हा पगार हातात आला त्यावेळी फक्त 22 दिवसांचा पगार त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तर पुकारलेल्या संपामुळे 9 दिवसांचा पगार कापला असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.(हेही वाचा-BEST Strike मिटला पण प्रशासन बेस्ट कर्मचार्यांचा पगार कापण्याच्या तयारीत? 'संपा' दरम्यानचं नुकसान भरून काढण्यासाठी उपाय)
7 जानेवारी रोजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी संपाची हाक दिली होती. त्यामुळे मुंबईकरांचे ही नाहक हाल झालेले दिसून आले. तर उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला संप मिटवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान उच्च न्यायालयाने संप मागे आदेश देताना बेस्ट कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे सांगण्यात आले होते.