खुशखबर! मुंबईतील रिक्षाचालकांकडून दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यत मिळणार Happy Hours, प्रवासी भाड्यात केली 15% नी कपात
खातुआ पॅनलने याबाबत महाराष्ट्र सरकार निवेदन पाठविले होते. त्यावर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे.
महागाईने कंबरडं मोडलेल्या मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! मुंबईतील रिक्षावाले (Rikshaw) आता हॉटेलप्रमाणे विशिष्ट वेळेकरता Happy Hours सुरु करणार आहेत. याची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या वेळेदरम्यान रिक्षाच्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. खातुआ पॅनलने याबाबत महाराष्ट्र सरकार निवेदन पाठविले होते. त्यावर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे.
ब-याच हॉटेल्समध्ये Happy Hours सुरु आहेत. Happy Hours मध्ये तुम्हाला खाण्या-पिण्यामध्ये मूळ किंमतीपेक्षा काही सूट देण्यात येते. हीच सूट तुम्हाला आता रिक्षाच्या मूळ भाड्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. ज्यात दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रिक्षाच्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालक संघटना नाराज असून याचा आपण विरोध करु असे रिक्षाचलाक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले आहे. रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात 1-3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता
त्याचबरोबर रिक्षाचालक सेनेचे प्रमुख राजेंद्र देसाई यांनी कोणताही रिक्षाचालक किंवा संघटना हा उपक्रम स्विकारणार नाही. आम्ही या विरोधात आमची वेगळी कमिटी स्थापन करु असेही ते म्हणाले.
हा निर्णयाची अंमलबवणी 'काली-पिली' टॅक्सीचालकांनी देखील करावी असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी याला विरोध केला. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे रिक्षाचालकांवर अन्यायकारक आहे असा नाराजीचा सूर रिक्षाचालकांकडून मिळत आहे.
तर दुसरीकडे अशीच बातमी कानावर येत आहे की, येत्या काळात रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 1 ते 3 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर खासगी कंपन्यांकडून सुद्धा सुरु करण्यात आलेल्या ओला, उबर सारख्या सेवेमुळे लोकल प्रवासाच्या सुविधेला फटका बसला आहे. तर नव्या सरकराच्या धोरणानुसार दर भाडे किती असणार आहे त्याबाबत ठरवण्यात आले आहे. त्यामुळेच रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.