मुंबई: रिक्षा चालकाची अश्लीलता! गर्दीचा फायदा घेत 19 वर्षीय तरुणीसमोर केलं हस्तमैथुन
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पवई: हिरानंदानी (Hiranandani)  परिसरात जॉगिंग करत असणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणी समोर ऑटोरिक्षा चालकाने हस्तमैथून (Masturbation)  केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) आली आहे. ही तरुणी मॅनेजमेंटची विद्यार्थीनी असून हा प्रसंग घडला तेव्हा ती बाहेर फिरण्यासाठी निघाली होती. घटनेनंतर या युवतीने ट्विट करून पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

काय आहे नेमकं प्रकरण ?

रात्री 11.54 वाजता ही युवती हीरानंदानी परिसरात जॉगिंग करत होती. ती तलावाच्या दिशेने धावत होती. हायवे दिसल्यानंतर ती पुन्हा मागे फिरली. पुढे बरेच लोक घोळका करून उभे असल्याचे दिसल्याने तरुणी घाबरली व त्यानंतर जवळच असलेल्या एका एटीएमच्या पायऱ्यांवर बसली होती. दरम्यान समोर उभ्या असलेल्या एक रिक्षा चालक रिक्षात बसून तिच्याकडे पाहत असल्याचे तिला जाणवले. याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताच त्याने चक्क तिच्याकडे पाहून हस्तमैथून करायला सुरवात केली. ही व्यक्ती ऑटोरिक्षा चालकाच्या गणवेशात होती.

हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने ही तरुणी पुरती गांगरून गेली होती त्यामुळे रिक्षा चालकाला जाब विचारणे तर दूर तिला त्या रिक्षाचा नंबर लिहून घ्यायचे ही सुचले नाही. मुंबई: ATM मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे, व्यक्तीला व्हिडिओच्या माध्यमातून अटक

पीडित तरुणीचे ट्विट

संबंधित तरुणी ही मूळ मुंबईची नसून 2015 पासून पवईत वास्तव्याला आहे. तरुणीचा दावा गंभीर असला तरी याबाबत तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यामुळे पोलिसांना रिक्षा चालकाचा शोध घेणे कठीण आहे. मात्र आसपासच्या परिसरात अनेक ऑफिसचे सीसीटीव्ही आहेत त्यात ही घटना रेकॉर्ड झाली असणार असे तरुणीचे मत आहे. या प्रकरणी परिसरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांची चौकशी सुरू करण्यात आली असून पोलीस संशयिताला पकडण्याच्या प्रयत्नात आहे