Bangladeshi Nationals Arrested In Mumbai: मुंबई मध्ये बनावट मतदार ओळखपत्र, रहिवासी पुरावा बाळगून राहणार्‍या चौघांना अटक; लोकसभा निवडणूकीत मतदान ही केल्याचे उघड

आरोपींची नावं रियाज हुसेन शेख, सुलतान सिध्दीक शेख,इब्राहिम शफिउल्ला शेख, फारूख उस्मानगणी शेख आहेत.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

बनावट पासपोर्ट च्या मदतीने भारतामध्ये आलेल्या 4 बांग्लादेशींना (Bangladeshis ) मुंबई एटीसने(Mumbai ATS) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिट कडून या चौघा बांग्लादेशींना अटक केली आहे. दरम्यान या अटकेमधील धक्कादायक बाब म्हणजे यापैकी दोघांनी लोकसभा निवडणूकीमध्ये मुंबई च्या जोगेश्वरी भागातून मतदान देखील केले आहे.

पोलिसांनी आरोपींवर आयपीसी कलम 465,468,471,34 अंतर्गत तसेच भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये कारवाई केली आहे. मूळच्या बांग्लादेशी असणार्‍या या आरोपींनी भारताचा पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. CAA Rules PDF Download Online: भारतामध्ये सीएए लागू; जाणून घ्या भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांसाठी काय आहेत नियम .

मुंबई मध्ये अटक झालेल्या या आरोपींकडे सूरत गुजरात मध्ये वास्तव्य केल्याचे पुरावे मिळाले आहेत. यामध्ये आरोपींव्यतिरिक्त अन्य 5 जणांनीही बनावट कागदपत्र बनवल्याचे समोर आले आहे. एकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया मध्ये नोकरीला गेल्याचे समोर आले आहे.

आरोपींची नावं रियाज हुसेन शेख, सुलतान सिध्दीक शेख,इब्राहिम शफिउल्ला शेख, फारूख उस्मानगणी शेख आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif