मुंबई: महिलेसमोर अश्लील चाळे केल्याप्रकरणी मरीन लाईन येथील एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याला अटक
महिलेसमोर अश्लील चाळे केल्याप्रकरणी (Sexually Assaulting Women) सोबो चायनीय रेस्टॉरंटच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मरिन लाईन्स (Marine Lines) येथे घडली आहे.
महिलेसमोर अश्लील चाळे केल्याप्रकरणी (Sexually Assaulting Women) सोबो चायनीय रेस्टॉरंटच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मरिन लाईन्स (Marine Lines) येथे घडली आहे. पीडित महिला ही परदेशी दूतावासात कामाला असून मरीन लाईन्स परिसरातील पारसी डेरी या ठिकाणी ती बसली होती. दरम्यान, पीडितेच्या समोर एक व्यक्ती गैरकृत्य करताना दिसला होता. पीडिताने सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, आरोपीने आपले गैरवर्तन सुरूच ठेवल्याने पीडित महिलेने एल.टी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
आलमगीर बकुर्ली मंडळ (21) असे आरोपीचे नाव असून मरीन लाईन येथील सोबो चायनिय रेस्टॉरंटमध्ये काम करतो. मरीन लाइन्स येथील पारसी डेरी याठिकाणी एक महिला सकाळच्या सुमारास मोबाईलवर बोलत बसली होती. मोबाईलवर बोलून झाल्यानंतर महिलेने फोन ठेवत समोर पाहिले असता, तिच्यासमोर एक व्यक्ती गैरकृत्य करताना तिला दिसला. तिने सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. मात्र, तरी देखील त्यांनी गैरवर्तन सुरुच ठेवले. अखेर या महिलेने एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर एल. टी. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही देखील समोर आले आहे. यावरुन पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय महिलांनीही घाराबाहेर पडायचे का नाही, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: फोनवर गप्पा मारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या; पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पतीची कबुली
मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिला पोलिसाकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली होती. तर आरोपी आणि पीडित महिला पोलिस हे दोघे कुर्ला येथील एकाच वस्तीत राहत असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले होते. पीडित महिला ज्या इमारतीत राहते त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये आरोपी राहतो. तर महिला ही तिच्या घराच्या बालकणीत उभी असताना आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने आपल्या अंगावरील कपडे उतरवल्याचा प्रकारसुद्धा केला असल्याचे पीडिताने सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2020 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

