मुंबई विमानतळावर कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला, तपास सुरु
तर शनिवारी महाराष्ट्र सरकारने एका विधानात असे म्हटले होते की. 105 लोकांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
मुंबईतील विमानतळावर कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला असल्याने त्याचा तपास केला जात आहे. तर शनिवारी महाराष्ट्र सरकारने एका विधानात असे म्हटले होते की. 105 लोकांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप 4 लोक निगराणीखाली आहेत. रविवारी 12 देशातील 2285 प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. त्यानुसार विविध देशातील प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये इराण, इटली, वियतनाम, नेपाळ, इंडोनेशिया, मेलेशिया, चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरिया येथील प्रवाशांचा समावेश आहे. यामधील एक संशयित व्यक्ती कोरोना व्हायरसचा आढळून आला आहे. मात्र अद्याप तो कोरोना असल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र सरकारच्या मते, मुंबईतील एका रुग्णालयात 2 जणांवर उपचार केला जात आहे. तर पुणे आणि नाशिक मधील व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान,महाराष्ट्रात कोरोना व्हायरचे संक्रामण झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. प्रदेशाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.18 जानेवारी ते आतापर्यंत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर एकूण 59,654 जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु यामधील बहुतांश जणांना कोरोनाचे संक्रामण झाले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु मुंबईतील विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. (Corona चा हाहाकार! चीन पाठोपाठ आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे बळी, वाचा सविस्तर)
जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर गेल्या 20 दिवसांपासून अडकून पडलेले 119 भारतीय मायदेशी परतले आहेत. 27 फेब्रुवारीला एअर इंडियाच्या विशेष विमानाने या भारतीयांना दिल्लीमध्ये (Delhi) आणण्यात आले. या विमानामध्ये भारतीयांशिवाय श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रीका आणि पेरुच्या नागरिकांचाही समावेश होता.