Mumbai Air Pollution: बीएमसीने 2 महिन्यांत जारी केल्या 868 स्टॉप-वर्क नोटिसा; वायू प्रदूषण मार्गदर्शन तत्वांच्या अनुपालनामुळे केवळ 57 रद्द

सर्व 24 प्रशासकीय वॉर्डांमध्ये खास तयार करण्यात आलेली 96 पथके या स्थळांची दैनंदिन तपासणी करत आहेत.

Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) वाढते प्रदूषण (Air Pollution) पाहता प्रशासनाने शहरात अनेक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांना बीएमसीने गेल्या दोन महिन्यांत 868 स्टॉप-वर्क नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यापैकी वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार्‍या बांधकाम साइट्ससाठी केवळ 57 नोटिसा रद्द करण्यात आल्या.

शहरातील 6,690 बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या साईट्सपैकी 2,995 जणांना 25 ऑक्टोबरपासून सूचना पत्र प्राप्त झाले आहेत. सर्व 24 प्रशासकीय वॉर्डांमध्ये खास तयार करण्यात आलेली 96 पथके या स्थळांची दैनंदिन तपासणी करत आहेत. पथकांनी बांधकाम आणि पायाभूत सुविधा अशा दोन्ही ठिकाणी 603 कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बांधकाम साइट्सची धूळ कमी करण्याच्या उपायांची अंमलबजावणी करत आहेत याची खात्री करण्यासाठी वॉर्ड-स्तरीय पथके ही साइट्सची तपासणी करत आहेत आणि उल्लंघन करणार्‍यांवर एफआयआर नोंदवले गेले आहेत. 29 डिसेंबर रोजी, ग्रँट रोडवरील दोन कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Mahavitaran Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! आता महावितरणच्या भरतीमध्ये होणार 'इलेक्ट्रिशियन' आणि 'वायरमन' अभ्यासक्रमांचा समावेश)

बहुसंख्य पायाभूत सुविधा प्रकल्प पश्चिम उपनगरात सुरू आहेत, त्यामुळे के पूर्व (अंधेरी पूर्व), एच पूर्व (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स- BKC) आणि वांद्रे पूर्व येथे मोठ्या प्रमाणात उल्लंघने होत आहेत. मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक पावसाळ्यानंतर खालावला, त्यामुळे नागरी संस्थेने 25 ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. बांधकाम कंपन्यांना धूळ कमी करण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर आणि फॉगिंग मशीन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.