Mumbai Agra Highway Accident: ब्रेक फेल कंटेनर हॉटेलमधे घुसला, 12 ठार; धुळे येथील घटना

अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhule Accident (Image Credit - ANI)

मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये (Container Accident) घुसला. धुळ्यात शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, NCP, महाविकासआघाडी, अजित पवार गट यांच्यात सकाळपासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना)

पाहा ट्विट -

एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाहा व्हिडिओ -

कंटनेर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.