Mumbai Accident: मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई अमहदाबाद महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाले आहेत. हे तीनही तरुण विरारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत दहिहंडी बघून एकाच दुचाकीवर घरी परतणार्या तीन तरुणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हे तिघेही युवक हे विरारच्या (Virar) मनवेलपाडा येथील सिद्धीविनायक चाळीत राहणारे असून गणेश कामत, यतीन साटम आणि रितेश सिंग असे त्यांची नावे आहे. (हेही वाचा - Online Games Restriction Time: गेमिंग अॅक्टिव्हिटी वर वेळेचं बंधन घाला; नागपूर खंडपीठामध्ये याचिका)
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाराज धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गणेश कामत याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांनी दिली आहे.
या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांनी दिली आहे. अपघातातील जखमी झालेल्या यतीन साटम याच्यावर ऑर्बिट रुग्णालयात तर रितेश सिंग याच्यावर विरारच्या संजिवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर मनवेल पाडा येथील सिद्धीविनायक निवास चाळ परिसरात शोककळा पसरली आहे.