Mumbai Accident: मोटारबाईकला अनियंत्रित कारची धडक,एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; लालबाग येथील घटना
घरी जात असताना रविवारी ही घटना घडली.
Mumbai Accident: परळ येथील लालबाग उड्डाणपूलावर एका अपघातात मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरी जात असताना रविवारी ही घटना घडली. दुचाकी कारला धडकल्याने अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत सोहेल शेख आणि त्यांचा मुलगा मोहम्मह अली शेख हे या अपघातात मरण पावले. (हेही वाचा- कार नाल्यात पडून भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात लालबाल उड्डाणपुलावरील निर्मल पार्क रेल्वे कॉलनीजवळ घडला. सोहेल कुटुंबासह दादर येथील यांच्या घराकडे उड्डापुलावरून जात होते. घरी परतत असताना, भरधाव वेगात असलेली कार त्यांच्या समोरून आली. हा अपघात रात्रीच्या 10.30 घडली. कार वेगवान होती आणि चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने पुढे जाऊन बाईकला धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की, वडील आणि मुलाला गंभीर जखम झाली. धडकेनंतर दुचाकी घसरली आणि धडकेने पिता-पुत्र दोघेही पुढे फेकले गेले. आई-मुलगी रस्त्यावर पडली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. चौघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चौघांनाही केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वडील आणि त्यांच्या मुलाचा रुग्णालायत पोहचे पर्यंत मृत घोषित करण्यात आले. आई आणि तिच्या मुलीची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते धोक्याबाहेर आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार, कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले. कार चालक फरार असल्याची माहिती समोर येत आहे.