Mumbai Accident: बसची कारला जोरदार धडक, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, दहिसर लिंक रोड येथील घटना

मुंबई येथील दहिसर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Accident (PC - File Photo)

Mumbai Accident: मुंबई येथील दहिसर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची माहिती  मिळाली आहे. कार आणि बस यांच्यात जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. बसचालक पोलिसांच्या ताब्यात आहे. (हेही वाचा- बिहारमध्ये अनियंत्रित स्कॉर्पिओ कार झाडाला आढळली, अपघातात तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी खरेदी करण्यासाठी पती पत्नी आणि त्याचा मुलगा बाजाराच्या दिशेने निघाले होते. कारमध्ये श्रीहरी बंगेरा वय( ५०) शोभा बंगेरा (वय ५०) आणि त्याचा मुलगा रोहन बंगेरा होता. विरारच्या दिशेने जाणाऱ्या नीता ट्रॅव्हलच्या एका बसने अचानक ब्रेक लावला आणि डावीकडे वळण घेतले. दरम्यान बस अनियंत्रित झाली आणि कारचा अपघात झाला आहे. बस आणि कारची जोरदार धडक झाली या धडकेत शोभा आणि श्रीहरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि रोहनला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केला. पती, पत्नी आणि मुलगा रोहनला दहिसर पूर्व येथील नवनीत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पती पत्नीला मृत घोषित केले. गंभीर दुखापतीत दोघांनी प्राण गमावले. रोहन अद्याप शुध्दीवर नाही अशी माहीती मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement