Stock Broker Arrested: मुंबईतील 25 वर्षीय अभिनेत्रीचा विनंभंग, स्टॉक ब्रोकरला अटक

मुंबई पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेत्रीचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केलेप्रकरणी एका स्टॉक ब्रोकरला (Stock Broker) मुंबई पोलिसांनी अंधेरी (Andheri) येथून अटक केली आहे. चित्रपटात भूमिकेसाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिचा विनयभंग (Molestation) करत लैंगिक शोषण केले असा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली. जिग्नेश मेहता (48) असे या ब्रोकरचे नाव आहे. त्याने एका 25 वर्षीय महिलेला अंधीर पूर्व येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी बोलावले होते. त्याने दावा केला होता की एका चित्रपट निर्मात्याशी तिची भेट घालून द्यायची आहे, असे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देऊन सांगितले.

दरम्यान, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मेहता याने हॉटेलच्या खोलीत तिला (अभिनेत्रीला) अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली.तिथे तिसरा कोणीही उपस्थित नव्हता. पण मिळाल्याले संधीचा फायदा घेऊन खोलीबाहेर पळून जाण्यात तक्रारदार यशस्वी झाला. त्याने हॉटेलच्या रिसेप्शनवरून पोलिसांना बोलावले. पोलिस येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी मेहता यांना तिथेच थांबवले, असेही पोलिसांनी सांगितले. (हे देखील वाचा: Pune: दारु पाजून 31 वर्षीय तरुणाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांकडून अटक)

महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि इतर गुन्ह्याखाली मेहता याला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेने पोलिसांना सांगितले आहे की तिची मेहता यांच्याशी ओळख चेंबूर येथे एका पार्टीत झाली जिथे दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली.