Mumbai Crime News: चेंबूरमध्ये ६५ वर्षाच्या व्यक्तीने मानसिकदृष्ट्या विकलांग मुलीवर केला बलात्कार, आरोपीला अटक,
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Crime News: चेंबूरच्या टिळक नगर भागात १६ वर्षीय मानसिकदृष्या विकलांग असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोरआली आहे.६५ वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केल्याचे समजले आहे. आरोपीवर पीडित तरुणाच्या कुटूंबीयांनी पोलीसांत तक्रार केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारीच राहायचा. त्याचे कुटूंबासोबत मैत्रीपुर्ण संबंध होते.पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर झाल्याने ही घटना उघडकीस आली.

मुलीचे वाढलेले पोट पाहून आईची चिंता वाढली

पीडित मुलीच्या आईला मुलीचे वाढलेले पोट पाहून चिंतेत आली. बुधवारी ही बाब समोर आली. आईने मुलीला डॉक्टरांकडे घेवून गेल्यावर ही घटना उघडकीस आली. मुलगी चार महिने गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कुटूंबियांना मोठा धक्का बसला. अथक प्रयत्नाने मुलीने आरोपीचे नाव सांगितले. जून मध्ये तीच्यावर काही तरी प्रकार घडल्याचे सांगितले.  या घटनेअंतर्गत आईने पोलिसांत तक्रार केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी त्याच्या राहत्या घरी पोहचले. आरोपी घरातून फरार झाल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी पथक तयार करून आरोपीला पकडले. आरोपीने गुन्हा कबुल केला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, आरोपींविरुद्धचे पुरावे तपासण्यात आले आहेत. मात्र, चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देत ​​जून ते सप्टेंबर या कालावधीत पीडितेवर तीनपेक्षा जास्त वेळा बलात्कार केल्याचे कबूल केले.