Mumbai 5th Sero Survey: मुंबईमधील 86.64% लोकांमध्ये आढळल्या Covid-19 अँटीबॉडीज; जाणून घ्या सीरो सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या पाचव्या सीरो सर्वेक्षणात (Fifth Sero Survey) 86 टक्के लोकसंख्येमध्ये कोविड-19 अँटीबॉडीज आढळल्या आहेत

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबईतील नागरिकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या पाचव्या सीरो सर्वेक्षणात (Fifth Sero Survey) 86 टक्के लोकसंख्येमध्ये कोविड-19 अँटीबॉडीज आढळल्या आहेत. बृहन्मुंबई शहरातील सर्व 24 वॉर्डांमधून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहभागींवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की, ज्यांना लसीचे एक किंवा दोन डोस मिळाले होते त्यांच्यापैकी 90.26 टक्के लोकांमध्ये कोविड-19 अँटीबॉडीज आहेत. महत्वाचे म्हणजे ज्यांना लसीचा एकही डोस मिळाला नव्हता, अशा 79.86 टक्के लोकांमध्येही अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

कोविड-19 विषाणू संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सीरो सर्वेक्षण करण्यात आले. रक्‍त नमुन्‍यांची चाचणी घेऊन त्यामध्ये कोरोना विरुद्धच्या अँटीबॉडीज शोधल्या जातात. 8,674 नमुन्यांच्या आधारावर झालेले हे सीरो सर्वेक्षण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा ट्रेंड ओळखण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.

सीरो सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी-

यावरून दिसत आहे की, मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभाग मिळून, झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये अँटीबॉडीजचे प्रमाण खूप वाढले आहे.