Mumbai: बनावट लोन अॅपच्या माध्यमातून लोकांना 2 लाखांचा गंडा, पोलिसांकडून चार जणांना अटक
याच रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून यामध्ये मुंबई सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेश आमि राजस्थान येथून काही जणांना अटक करण्यात आली आहे.
आठवी नापास असलेल्या काही व्यक्तींकडून सर्वात मोठे सायबर रॅकेट सुरु होते. याच रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून यामध्ये मुंबई सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेश आमि राजस्थान येथून काही जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी बनावट लोन अॅपच्या माध्यमातून काही लोकांना 2 लाखांचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. लोन प्रोसेसिंग फी च्या नावाखाली आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केली जात होती.(मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! OTT वर Live Porn दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश)
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव कुमार सिंह याचा उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. त्यानेच इंजिनिअर्स आणि अॅप डेव्हलपर्सचा मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जवळजवळ 11 अॅप तयार केले. या अॅपच्या माध्यमातून लोकांकडून कर्ज मिळवण्यासाठी लोन प्रोसेसिंग फी घेतली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.(Lockdown बाबत खोटी अफवा पसविणा-यांवर कठोर कारवाई होणार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती)
गुन्हे शाखेच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी असे म्हटले की, सोशल अॅनालाइस टीमला प्रधान मंत्री योजना लोन आणि मुद्रा लोन संदर्भात सोशल मीडियात काही लिंक्स मिळाल्या. त्यात लोन देण्यासंदर्भात लिहिले होते. अॅप व्यतिरिक्त आरोपीने वेबसाइट सुद्धा तयार केली होती.त्यात नागरिकांची माहिती लिहिण्यास सांगितले जात होते. त्यानंतर लोनसाठी नागरिकांना युपी आणि जयपुर येथे सेटअप करण्यात आलेल्या कॉल सेंटरमधून फोन केले जात असल्याची ही पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.