कुर्ला स्थानकात मुंबई लोकल खाली आल्याने 35 वर्षीय तरूणाचा मृत्यू

दरम्यान ही घटना मंगळवार (17 डिसेंबर) च्या रात्रीची आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईच्या हार्बर लाईनवर 35 वर्षीय व्यक्तीने मुंबई लोकलसमोर उडी मारून आपलं जीवन संपवल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान ही घटना मंगळवार (17 डिसेंबर) च्या रात्रीची आहे. कुर्ला स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. मृत व्यक्तीचं नाव सेतू राम (Setu Ram) असे आहे तर तो बिहारचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई: डोंबिवली - कोपर स्थानका दरम्यान लोकलमधून पडून 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू

मंगळवारी रात्री 10.50 च्या सुमारास इतर प्रवाशांसोबत सेतू राम कुर्ला स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर उभे होते. तेव्हा अचानक त्याने प्लॅटफॉर्मवर उडी मारली. अचानक ट्रेनसमोर आल्याने त्यांच्या शरीरापासून मानेचा भाग बाजूला गेला. त्यानंतर धडाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. सेतू राम यांच्या पॅन्टमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये चार क्रमांक होते. पोलिसांनी कॉल केल्यानंतर3 नंबर नॉट रिचेबल होते तर एका क्रमांकावर संपर्क झाला आहे. बबिता देव या महिलेशी पोलिसांचा संपर्क झाला असून त्यांची मृत सेतू राम यांच्यासोबत ओळख पटली आहे.

सेतू राम एलटीटी वरून बिहारला जात होता. दरम्यान त्याने रेल्वे रूळावर उडी का मारली हे  अद्याप समजू शकलेले नाही. GRP कडून अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. बुधवार (18 डिसेंबर) दिवशी मृताचे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif