मुंबई: KEM रूग्णालयात आगीत होरपळलेल्या 3 महिन्यांंच्या प्रिंसचा अखेर मृत्यू
केईएम रूग्णालयामध्ये आयसीयूत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत होरपळल्याने 3 वर्षीय प्रिन्सचा ( Prince Pannelal Rajbhar) हात कापावा लागला होता.
केईएम रूग्णालयामध्ये आयसीयूत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत होरपळल्याने 3 वर्षीय प्रिन्सचा ( Prince Pannelal Rajbhar) हात कापावा लागला होता. मागील काही दिवसांपासून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे सुरू असलेले प्रयत्न आज (22 नोव्हेंबर) दिवशी अखेर अपयशी ठरले. आज प्रिन्सचा उपचारादरम्यान पहाटे 3 च्या सुमारास मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची अवस्था गंभीर होत होती. मुंबई: KEM मध्ये होरपळून हात गमवलेल्या 3 महिन्यांच्या प्रिन्सला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार.
ANI Tweet
केईएम रूग्णलयात झालेल्या या अपघातानंतर अनेकांनी हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाचा निषेध केला होता. मुंबई पालिका प्रशासनाकडून त्याला मदत जाहीर करण्यात आली आहे. 2018 साली अशाप्रकारे राजेश मारू या तरूणाचा नायर रूग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचलं गेल्याने मृत्यू झाला होता.