मुंबई मध्ये बेशिस्तपणे बाईक चालवणार्‍यावर कारवाई करायला गेलेल्यावर चाकू हल्ला; 22 वर्षीय आरोपी ताब्यात

22 वर्षीय मुलाने ट्राफिक कॉन्स्टेबलला आणि टोईंग व्हॅन अटेंडंटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे.

Traffic Police (PC - wikimedia commons)

मुंबईच्या (Mumbai) परेल (Parel) भागामध्ये एकाला बेशिस्तपणे गाडी चालवण्याच्या, हेल्मेट न घालण्याच्या आणि बाईकवर नंबरप्लेट नसण्यावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पण या कारवाई दरम्यान 22 वर्षीय मुलाने ट्राफिक कॉन्स्टेबलला आणि टोईंग व्हॅन अटेंडंटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. त्याने हवेत लहानसा चाकू फिरवल्यानंतर एकाला छातीवर जखम झाली आहे.

दरम्यान बायकरचं नाव Aryaman Verma आहे. त्याला ट्राफिक पोलिसांनी ताब्यात घेऊन परेलच्या पोलिस चौकीमध्ये नेले. जेव्हा त्याच्या कुटुंबियांना या कारवाई बद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी आर्यमन वर मानसिक रोगाचे उपचार सुरू असल्याचे सांगितले. यानंतर वर्माला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली मात्र त्याला नोटीस बजावलेली आहे. त्याच्यावर अजामिनपात्र गुन्हा आहे.

TOI शी बोलताना पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये वर्मा वर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणं तसेच मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Jaipur Express Firing: मुंबईत जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, आरपीएफ जवान पोलिसांच्या ताब्यात, मृतदेह बोरीवली स्टेशनवर (Watch video) .

.भोईवाडा ट्राफिक डिव्हिजन कॉन्स्टेबल नितीन वाघमारे खानोलकर चौकात ड्युटीवर होते. यावेळी त्यांनी हेल्मेट नसलेल्या, स्पिडिंग करणार्‍या वाहनावर ग्लोबस हॉस्पिटल जवळ कारवाई केली. जेव्हा गाडीची कागदपत्रं विचारण्यात आली तेव्हा त्याने वाद घालण्यास सुरूवात केली. वाघमारेंनी त्याला चौकीत नेले. शाब्दिक चकमकीनंतर त्याने छोटा सूरा काढला. हवेत फिरवताना एक जण सुरक्षित राहिला मात्र एकाच्या छातीवर त्याचा वार बसला. गायकवाड यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. जखमेवर उपचार करून त्यांना घरी सोडले.