मुंबई: बॉयफ्रेंड कडून बलात्कार झाल्याने तरूणीने मारली 6 व्या मजल्यावरून उडी; 20 वर्षीय मुलाला अटक

पिडीत मुलगी दैव बलवत्तर असल्याने बचावली आहे. सहाव्या मजल्यावरून ती थेट जमिनीवर न पडता मेटल रूफ वर पडल्याने बचावली आहे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

दक्षिण मुंबई (South Mumbai)  मध्ये एका 20 वर्षीय मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडच्या बलात्कारानंतर सहाव्या मजलावरून उडी मारून जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मागील आठवड्यातील दक्षिण मुंबई परिसरातील आहे. तरूणीला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबामध्ये तिच्यावर बॉयफ्रेंड कडून बलात्कार झाल्याचं सांगण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार मागच्या आठवड्यात झाला आहे. 19 वर्षीय मुलीने सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली आहे. तिला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर लगेजच हा प्रकार पोलिसांना देखील कळवण्यात आला आहे. मुलगी शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी तिला घडल्याप्रकराबाबत विचारले. त्यावेळेस लग्नाचं वचन देऊन आता माझा बॉयफ्रेंड मागे फिरल्याने हे टोकाचं पाऊल उचलत असल्याची माहिती तिने दिली आहे. यावेळेस तिने बॉयफ्रेंड कडून लग्नाच्या आश्वासनावर बलात्कार देखील झाल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी IPC 376, 376 (2) (N) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम लहान मुलांच्या सेक्सुअल ऑफेन्स विरूद्धच्या प्रोटेक्शन बाबतची आहेत. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासांत त्या तरूणाला अटक केली आहे. नंतर कोर्टात दाखल केल्यानंतर पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.

दरम्यान या घटनेमध्ये पिडीत मुलगी दैव बलवत्तर असल्याने बचावली आहे. सहाव्या मजल्यावरून ती थेट जमिनीवर न पडता मेटल रूफ वर पडल्याने बचावली आहे. सध्या ती हॉस्पिटल मध्ये दाखल असून उपचार सुरू आहेत तसेच तिच्या जीवावरचा धोका टळला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now