IPL Auction 2025 Live

Mucormycosis: महाराष्ट्रात म्युकरमायकोसीस रुग्ण वाढले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली महत्त्वपूर्ण माहिती

संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने या आजाराबाबत आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

Mucormycosis | (File Image)

कोरोना व्हायरस संसर्गाचा राज्यातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच आव्हान कायम असतानाच आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) नावाच्या आजाराचे नवेच संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. राज्यातील म्युकरमायकोसिस (Mucormycosis Disease) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. प्रामुख्याने कोरोना व्हायरस (Coronavirus) आजारातून बरे झालेल्या काही लोकांना म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे पुढे येत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने या आजाराबाबत आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतू, सर्व काळजी घेऊनही हा आजार बळावला तर आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला या वेळी राजेश टोपे यांनी केंद्राकडे काही मागण्या केल्या. या मागण्या खालील प्रमाणे. (हेही वाचा, Mucormycosis Disease: मुंबईत ‘म्युकरमायकोसिस’ च्या 111 रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती)

म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे

दरम्यान, म्युकरमायकोसीस या आजाराची राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतील असून, उपचारास प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्यपणे या आजारांवरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना या आजारांच्या उपचारासाठी आर्थिक भार पडू नये यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राज्यातील म्युकरमायकोसीस आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील. म्युकरमायकोसीस ग्रस्त रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य' (Mahatma Phule Jan Arogya Yojana) योजनेतून मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.