MSRTC Workers Strike: आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही; भेटीसाठी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची अट

राज ठाकरे यांची भेट घेतलेले सर्व एमएसआरटीसी (MSRTC) कर्मचारी हे संपावर आहेत.

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी आज (11 नोव्हेंबर) महाराष्ट्र नवनिर्मान सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतलेले सर्व एमएसआरटीसी (MSRTC) कर्मचारी हे संपावर आहेत. एमएसआरटीसीचे राज्य सरकारी सेवेत विलीनिकरण करा या प्रमुख मागणीसह, वेळवरती पगार आणि इतर मागण्यांसह हे कर्मचारी राज्यभर संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या एका प्रथिनिधी मंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी राज ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांसमोर एक अट ठेवली. ही अट मान्य असेल तरच आपण पुढे संवाद करु असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना अट ठेवत सांगितले की, 'मी आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आत्महत्या करणं बंद करा. आत्महत्या करणं बंद करा हिच माझी पहिली अट असेल' असे राज ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांना सांगत काळजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली कैफीयत आणि सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्राला जोडण्याचे काम करतो. राज्याच्या ग्रामिण भागात तळागाळात पोहोचतो. असे असतानाही आमच्याच कामाचे पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाहीत. राज्यभरात इतर घरांमध्ये दिवाळी होत असताना आमच्या घरात दिवाळी नाही. नेमके आमच्या पगाराच्या वेळीच पैसे कसे काय नसतात? अशी प्रश्नात्मक भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 250 बस डेपो बंद, 918 कर्मचारी निलंबित)

आमच्या घरातील लोक मोठ्या आशेने आमच्याकडे पाहत आहेत. बारा दिवस संप केल्यानंतर कुठे विलीनिकरण समिती स्थापन झाली आहे. प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाची तारीख आली आहे. आता पुढची तारीख आली तर घरात बायका-पोरांना काय तोंड दाखवायचं? अशीही भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बारा दिवस संप सुरु आहे. त्यामुळे आगोदरच 12 दिवस विदाऊट पे झाले आहे. आता पगारही वाढला नाही तर मग करायचे तरी काय? विलिनीकरणासाठी न्यायालयाची तारीख येईल. त्यातून फटाके वाजतील. पण हाती काहीच लागले नाही तर काय करायचे? त्यामुळे आगोदर आयोग लागू करा मग विलिनीकरणावर विचार करा, अशी मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.