IPL Auction 2025 Live

मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर एसटी चालवणार 70 विशेष बस; मंकी हिल ते कर्जत दरम्यान मेगाब्लॉक च्या पार्श्वभूमीवर निर्णय

नियमित बससोबतच पुढील महिन्याभरासाठी या विशेष गाड्यांमुळे नियमित मुंबई-पुणे प्रवास करणार्‍या अनेकांना फायदा होणार आहे.

ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

कर्जत जवळ मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर पुढील 30 दिवसांसाठी रेल्वे प्रशासनाकडून खास मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्याचा परिणाम प्रवाशांना होऊ नये म्हणून एस टी महामंडळाकडून मुंबई ते पुणे, ठाणे ते पुणे अशा 70 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. नियमित बससोबतच पुढील महिन्याभरासाठी या विशेष गाड्यांमुळे नियमित मुंबई-पुणे प्रवास करणार्‍या अनेकांना फायदा होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिनाभर मेगाब्लॉक; 22 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

कामाच्या निमित्त अनेकजण रोज पुणे- मुंबई असा प्रवास करतात. अशांसाठी रेल्वे सेवा हा सोयीचा आणि आरामदायी वाहतूक पर्याय होता. मात्र आता मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. मात्र एस टी महामंडळ आता प्रवाशांच्या मदतीला धावून आले आहे. आता शिवनेरीच्या मुंबई- पुणे महामार्गावर सुमारे 465 फेर्‍या उपलब्ध आहेत.

M Indicator ट्वीट 

Infrastructure work on southeast ghat between Monkey Hill and Karjat on Up line upto 30.11.2019. #CRUpdate

एसटी कडून चालवण्यात येणार्‍या नव्या फेर्‍या ठाणे, कुर्ला, परळ डेपोमधून चालवल्या जाणार आहेत. ठाणे विभागातून 20, मुंबई विभागातुन् 15, पुणे विभागातून 15 तर शिवनेरी बससेवेच्या 20 अधिक गाड्या मुंबई-पुणे रस्त्यावर धावणार असल्याने आता 70 अधिक गाड्या पुढील महिन्याभरासाठी धावणार आहेत.