MSRTC Employees Strike: एसटी कामगारांचा संपामध्ये आता परळ डेपो चा ही समावेश

राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर उद्या (8 नोव्हेंबर) दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे

ST Bus, Image used for representational purpose | (Photo Credits: File)

मुंबई (Mumbai) मध्ये परळ एसटी आगारातील (Paral ST Bus Depo) कर्मचार्‍यांनी काम बंद करत राज्यात सुरू असलेल्या संपामध्ये सहभाग घेतला आहे. सध्या मुंबई सेट्र्ल एसटी डेपो मध्येही काही कर्मचारी संपाला पाठिंबा देत आहेत त्यामुळे आता एसटीचे आता सुमारे 91 डेपो ठप्प झाले आहेत. राज्यात यंदा दिवाळीच्या धामधूमीमध्ये आणि सुट्ट्या सुरू असतानाच एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला असल्याने बससेवा प्रभावित झाल्याने अनेकांचा खोळंबा झाला आहे. सध्या हा संपाचा वाद आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता कोर्ट एसटी कर्मचार्‍यांना काय आदेश देत आहेत यावर पुढील दिशा ठरणार आहे.

दरम्यान काही मागण्या सरकार कडून मान्य झाल्यानंतर संपामध्ये एका गटाने नरमती भूमिका घेतली आहे. पण एक गट अजूनही संपावर कायम असल्याने त्याचा प्रभाव जाणवत आहे. बॉम्बे हाय कोर्टाने संपातील कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अजूनही संपात सहभागी असलेल्यांना कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागणार हे पहावं लागणार आहे.

राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर उद्या (8 नोव्हेंबर) दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. कामगार संघटनेला संपावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सध्याच्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नाही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घ्यावा. संप करण्याचा प्रयत्न केल्यास ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील, असा इशारा हायकोर्टाने एसटी संघटनेला दिला आहे. एसटी कर्मचारी सोमवार 8 नोव्हेंबर पासून कामगार कामावर रुजू झाले नाहीत तर बडतर्फीची कारवाई करणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.