MSRTC Cash Incentive Program: महसूल आणि सेवा गुणवत्तेला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाची नवी योजना; चालक-वाहकांना दिला जाणार प्रोत्साहन भत्ता

ही नवीन पायलट योजना एका महिन्यासाठी चालेल. त्यानंतर ती रिव्ह्यू करून तिचे पुढचे नियोजन केले जाईल. मात्र प्रवासी तक्रारी किंवा गैरवर्तनात गुंतलेले ड्रायव्हर आणि कंडक्टर प्रोत्साहनासाठी पात्र नसतील. केवळ व्यावसायिक मानकांचे पालन करणाऱ्यांनाच बक्षीस दिले जाईल.

ST Bus (File Image)

MSRTC Cash Incentive Program: तब्बल 9 वर्षांनंतर एसटी महामंडळ पहिल्यांदाच ऑगस्ट 2024 मध्ये फायद्यात आले. यावेळी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांचा फायदा झाला. आता प्रवासी वाहतुकीतून महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) ने ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी एक नवीन रोख प्रोत्साहन कार्यक्रम (Cash Incentive Program) सुरू केला आहे. या योजनेंतर्गत, प्रति ट्रिप ज्यांनी त्यांचे महसूल लक्ष्य ओलांडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के  अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. हे उत्पन्न कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतले जाईल. महत्वाचे म्हणजे ज्या दिवशीच्या ड्युटीवर लक्ष्य ओलांडले जाईल, त्याच दिवशी हे रोख बक्षीस वितरित केले जाईल.

एमएसआरटीसीकडून आधीच त्यांचे महसूल वाढवण्यासाठी, ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कर्मचारी पालक दिन’ यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचा उद्देश प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हा आहे.

या व्यतिरिक्त, प्रवाशांना मदत करण्यासाठी आता प्रत्येक बसवर आगार प्रमुखांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष अधिकारी तोट्यात असलेल्या डेपोंना मार्गदर्शन करत आहेत. इंधन कार्यक्षमतेबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासह महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी बस पास थेट शाळांमध्ये पोहोचवून प्रक्रिया सुव्यवस्थित केली आहे. आता महसुलात सातत्य राखण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टरची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून, त्यांची कामगिरी वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. म्हणूनच महामंडळाकडून रोख बक्षीस योजना सुरु केली जात आहे. (हेही वाचा: Maharashtra ST Bus To Ayodhya: लालपरी थेट आयोद्धेला जाणार; प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी राज्य परिवहन महामंडळाची नवी योजना)

ही नवीन पायलट योजना एका महिन्यासाठी चालेल. त्यानंतर ती रिव्ह्यू करून तिचे पुढचे नियोजन केले जाईल. मात्र प्रवासी तक्रारी किंवा गैरवर्तनात गुंतलेले ड्रायव्हर आणि कंडक्टर प्रोत्साहनासाठी पात्र नसतील. केवळ व्यावसायिक मानकांचे पालन करणाऱ्यांनाच बक्षीस दिले जाईल. ड्रायव्हर आणि कंडक्टरची एकूण कामगिरी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दरम्यान, कोविड-19 महामारीपूर्वी, एमएसआरटीसी दररोज अंदाजे 65 लाख प्रवाशांना सेवा देत असे. महामारीच्या काळात ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असली तरी, सध्याच्या प्रयत्नांमुळे दैनंदिन रायडर्सची संख्या सुमारे 55 लाख झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now